वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान.!
वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान
क्रांतिघोष करून आंदोलनाचा
चालून जा रे आंबेडकर वीरांनो
मृत्यूतत्त्ववादी बंडलबाजाचा
फसवा चेहरा उजागर करा वीरांनो ...
प्रस्तावना :
आंबेडकरवाद हा एक मुलतः परिवर्तनीय महाऊजेचा मुख्य स्त्रोत आहे. भारतीय समाजाला व जगातील सर्व मानवाला नव्या मूल्यमंथनाचा नवा अविष्कार देणारा महाप्रकल्प आहे. आंबेडकरांच्या क्रांतीत्त्वाने भारतीय समाजाचा ,शिक्षणाचा, राजकारणाचा, धर्माचा व विज्ञानाचा चेहरामोहराच बदललेला आहे. आंबेडकरवादी आंदोलनाने देशाला नवी मूल्यसंहिता दिली आहे .धगधगत जळणाऱ्या मानवाला धम्माची शांतता देण्याचे काम आंबेडकरवादी आंदोलनाने केलेले आहे.
आंबेडकरवादी आंदोलन हे समता मुलक मानवतावादी विचारांचा मूल्यजागर आहे.
भारतीय समाजातील विषमतामय मुळांना आग लावून समतेचे मानवीय सरोवर निर्माण करणारा संवेदनशील आविष्कार म्हणजेच आंबेडकरवाद होय .आंबेडक...
