फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!
फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!अकोला (प्रतिनिधी) : अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सभेसाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. स्नेहल सोहनी यांना एका हॉटेलमध्ये ‘जात’ आणि ‘पक्षीय चिन्ह’ पाहून रूम देण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.नेमके काय घडले?वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेसाठी डॉ. स्नेहल सोहनी या मुंबईतून अकोल्यात दाखल झाल्या होत्या. मुक्कामासाठी त्यांनी रायझिंगसन हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांना हॉटेलमध्ये रूम दाखवण्यात आली. मात्र, त्यांचे सामान उघडल्य...


