Friday, October 31

Tag: माझा

माझा भाऊ…राया
Article

माझा भाऊ…राया

माझा भाऊ…रायामला आठवतयं तो कोरोनाचा भयंकर काळ होता.त्या दिवसात घराच्या बाहेर कुणी पडत नव्हतं.गावात जाता येत नव्हतं. म्हणून मी गळ घेऊन तळ्यावर मासे धरायला एकटाच जात होतो.मासा काही गळाला लागला नाही कधीच.पण नाद बेक्कार लागलेला होता.एक दिवस असाच दुपारी भर उन्हात मी गळ घेऊन बाहेर पडलो.अखंड दिवस तिथं घालवत असल्यामुळे सोबत जेवण आणि पाण्याच्या दोन बाटल्या घेतल्या होत्या. जसं जसं मी तळ्याच्या दिशेने जवळ जाऊ लागलो तसं कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला.कुत्र्यांची काळवंड लागलेली असेल म्हणून फारसे लक्ष दिले नाही.मी बांध चढला.आणि बांधावर आलो तेव्हा पाहतो तर, एका माकडाला सात आठ कुत्र्यांनी गराडा घातला होता.ते माकड तसच बसून सगळ्या कुत्र्यांच्या अंगावर धाव घेऊ पाहत होतं.दात इचुकन अंगावर जाऊ पाहत होतं.पण त्याला जागेवरून हालता येत नव्हतं.मी हातात दगड उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला.कुत्री पळाली....