Sunday, October 26

Tag: #महाराष्ट्र राजकारण

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंट
Article

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंट

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंटबंजारा समाज हा पारंपरिकरीत्या व्यापारी व जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारा समाज आहे. "गोर" म्हणून ओळखला जाणारा हा समाज भारताच्या प्रत्येक राज्यात पसरलेला आहे. त्यातल्यात्यात महाराष्ट्र, तेलंगणा,आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,कर्नाटक,गुजरात,राजस्थान येथे यांची लक्षणीय वस्ती आहे.आज बंजारा समाज प्रामुख्याने शेतमजूर, कामगार,नावालाच लहान व्यापारी व बोटावर मोजण्याइतके सरकारी नोकरदार म्हणून जगतो आहे.परंतु हा समाज सामाजिक न्यायाच्या शर्यतीत खूप मागे राहिलेला आहे. व आज मागे राहिल्याची भावना समाजात तीव्र होत आहे.भारतातील लोकशाहीत कोणत्याही समाजघटकाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलने, मोर्चे,अर्ज,निवेदन ही साधने वापरावी लागतात. बंजारा समाज,ज्याला लांब इतिहास आहे,तो देखील शिक्षण,नोकरी,सामाजिक न्याय या प्रश्नांवर संघर्ष करीत आल...
ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल
News

ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला 'ओला दुष्काळ जाहीर करा' असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा श...
ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल
News

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.सरकारचा नियम आणि शेतकऱ्यांचे प्रश्नआंबेडकर म्हणाले, "ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी...
बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग
Article

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभागबंजारा समाज हा भटक्या जीवनशैलीसाठी परिचित आहे. व्यापारी, पशुपालक,धान्यवाले,वाहतूक करणारे,जंगलातून स्थलांतर करणारे असे विविध व्यवसाय समाजाने इतिहासात केले.ब्रिटिश राजवटीत वसाहती कायद्यांतर्गत त्यांना “गुन्हेगार जमाती”चा शिक्का बसला होता.हा डाग १९५२ नंतर दूर झाला,पण सामाजिक व आर्थिक परिणाम मात्र आजतागायत जाणवत आहेत.बंजारा समाजात शिक्षणाच्या संधींची कमतरता,गावाबाहेर वसाहती,आरोग्याची दयनीय अवस्था,स्त्री-पुरुष दोघांच्याही रोजगारातील मर्यादा या कारणांमुळे बंजारा समाज अजूनही मोठ्या प्रमाणावर वंचित आहे.शिक्षण,नोकरभरती,राजकीय प्रतिनिधित्व या क्षेत्रांत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.म्हणूनच त्यांची मागणी आहे की त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात (एस.टी.) समाविष्ट करावे.महाराष्ट्रातील विविध समाजघटकांनी मागील काही दशकांत...
बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार
News

बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून प्रचंड पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी कोणतीही ठोस दखल घेतली नाही, असा आरोप करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत आगळीवेगळी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत आणि शेतकऱ्यांच्या दुःखाला कोणी न्याय देणार, असा प्रश्न या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजतक्रारीनंतर सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले :"शासनाचा वेळ आल्यावर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात होतो...
दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार
News

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात नेला आहे. यामध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.दिवाळीनंतर लगेच नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, त्यामुळे राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा कालावधी मोठ्या प्रमाणात लांबणार असून, विकासकामांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमहापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ ज...