तळेगावची धग…
तळेगावची धग...मी पंचाहत्तर साली नागपुरात असताना एका वाचनालयात उद्धव ज. शेळकेंची ' धग ' कादंबरी माझ्या हातात पडली. खरं तर पाच वर्षांपासून मी ह्या पुस्तकाच्या शोधत होतो. पण सापडत नव्हते. त्याला कारणही तसेच होते. काय झाले की एकदा आई वडिलांचे खूप भांडण झाले. अधूनमधून ते व्हायचेच. असे भांडण झाले की वडील रागे भरत. मग त्यांचे जेवण बंद, म्हणजे उपोषण. अशी उपोषणं आणि सत्याग्रह घराघरातून सुरू असतातच. नवराबायकोचे भांडण झाले की दोघांपैकी एक रुसतो आणि दुसरा समजावत राहतो.वडील उपोषणाला बसले की त्यांना समजावण्याची जबाबदारी माझ्याकडे असे. खूप प्रयत्नानंतर ते उपोषण सोडायला राजी होत. आधी आईची खूप निंदा करत , मी हो ला हो लावत ऐकून घेई. मत प्रदर्शन मात्र करत नसे. कारण आईची बाजू घेतली तर त्यांचा राग अजूनच वाढण्याची भीती. आईच्या निंदेत सहभागी झालो तरीही पंचाईत. कारण आई स्वयंपाक खोलीच्या दाराआड बसून सारे ...








