सोलापूर धम्मसंगीतीत मोठा निर्णय | बौद्ध संस्कारांमध्ये एकसूत्रतेची मागणी
सोलापूर धम्मसंगीतीत मोठा निर्णय | बौद्ध संस्कारांमध्ये एकसूत्रतेची मागणीसोलापूर | प्रतिनिधीसोलापूर येथे आयोजित सहावी धम्मसंगीती यशस्वीरित्या संपन्न झाली. बौद्ध धम्म हा लोककल्याणकारी असून बौद्ध संस्कार विधींमध्ये साधेपणा, समानता आणि एकसूत्रता असावी, तसेच विधींमध्ये आलेले भांडवलीकरण टाळले पाहिजे, असे प्रतिपादन उद्घाटक डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी केले.रविवार, ७ जून २०२६ रोजी वेळुवण बुद्ध विहार, शिक्षक हाउसिंग सोसायटी, दक्षिण सदर बाजार, सोलापूर येथे ही धम्मसंगीती पार पडली. बौद्ध समाजातील विविध संघटनांच्या सहभागातून आयोजित या कार्यक्रमाचे संचालन अध्यक्षीय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.अध्यक्ष मंडळात भिक्खुणी धम्मचारिनी, देहू रोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचे अध्यक्ष भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड, नागपूर बुद्ध विहार समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध, संभाजीनगरचे...
