सोशल नेटवर्किंगच्या युगात
सोशल नेटवर्किंगच्या युगातसोशल नेटवर्किंगच्या युगातफॅमेली नेटवर्कींग संपत चाललय...नात्याचा अख्खा नेटपॅक संपत्तीच्या हव्यासा पाई महाग होत आहे.
भिंतीला भिंत लागून असून सुद्धा संबधाच नेटवर्क हँग मारतय...
सर्वच्या सर्व नाते जवळ जवळ असतांना सुद्धा आपण सारे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहो.
आठवनींचा डाटा नुसताच साठवून ठेवतोय...
आपण पुसटशी नजरही टाकत नाही त्या इमेजवर,
कित्तेकदा तर डिलीट मारून मोकळे होतो,
एकमेका बद्दलच्या तिरस्काराचा डाटा मोबाईल मध्ये फुल्ल झाला म्हणून...
कधी कधी नकोसा वाटतो हा फोरजी फाईवजी
आणि एकशे अठ्ठाविस जीबी चा डाटा...
अस वाटत
मामाच पत्रच बर होत,
हारवल तरी ते कुणाला ना कुणाला तरी ते सापडत होतं...!हे वाचा – नाट्यप्रेमी करजगाव- विजय ढाले
#बिब्बा
सोशल नेटवर्किंग...

