Friday, November 14

Tag: बहुजनांचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

बहुजनांचे राजे राजर्षी  छत्रपती शाहू महाराज
Article

बहुजनांचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र वंदन .राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दि.26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यामध्ये झाला.त्यांचे मूळ नाव यशवंत होते.त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब ) तर आईचे नाव राधाबाई होते.छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.       कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दि.17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे " शाहू " हे नाव ठेवण्यात आले.सन1889 ते 1893 या चार वर्षाच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला.शिक्षण सुरू असतानाच दि.1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षाचे होते  आणि ...