Monday, October 27

Tag: #प्रायव्हसी

प्रायव्हसी 
Article

प्रायव्हसी 

प्रायव्हसी  मुळात आपल्या इकडे मुल व्हायची किती घाई . दोन वर्ष तरी वेळ द्यावा एकमेकांना  आणि मुलगी 18 /19  वर्षाची असेल तर पाच वर्ष .जुनी खोडं तशीच ओरडू द्यावी .त्यांना नातवंडांचे तोंड बघायची खूप घाई . मुलं व्हायच्या आधीची प्रायव्हसी मुलं झाल्यावर रहात नाही मग काय करावे ? माझी बहिण कॉलेजला शिकत असताना तिने मला एक किस्सा सांगितला होता .तिच्या मैत्रिणीचे आईवडील त्यांच्या प्रत्येक मॅरेज ऍनिव्हार्सरीला सकाळी सहा वाजता घरातून निघून जातात आणि थेट रात्री 10 /11 ला घरी येतात . त्यांच्या दोन मुली घरीच असतात आणि आई बाबा कुठे गेले हे त्यांना माहीत नसते .त्या दिवशी त्या बहिणी घर सांभाळतात. ही सवय त्यांना लहापणापासूनच लावली गेली. माझ्या एका नात्यातील मावशीकडे मी लहान असताना गेले होते .शहरात घर लहान आणि घरात माणसं भरपूर. स्वतः ची मुलं ,नणंद आणि जावेची मुलं शिकायला घरी आणि सासू. संध्याकाळी सगळे मिळू...