पारावरच्या गप्पा….!
पारावरच्या गप्पा....!खालच्या आळी चा दादा" देवळा समोर बसलेल्या पोरांना काय तरी सांगत व्हता. लांबून ऐकू येईना म्हणून , जवळ जाऊन ऐकाव म्हणून आप्पा "देवळा जवळ आला.आप्पा काही झालं तरी इरोधी पार्टीचा. त्यामुळं त्याला दादा नेमकं काय बोलतोय हे जाणून घ्यायला आप्पाला मोकर उत्सुकता.आता दादा म्हंजी मोठी आसामी त्यात गावातल सरपंच पद राखीव असल्यामुळे उपसरपंच पद दादा कड व्हत. पांढरी फॅक कापड . उंची बी चांगली शरीर पण धडधाकट , म्हणतात ना टक्कलम कवचितच दारिद्रम...अगदी तसच डोक्यार टक्कल , पण हुशार आणि लै अक्कल असल्या मुळे दादा गावगड्यात नेहमी पुढंअसणार .शिवाय दादा चा चुलता,म्हंजी नुसतं गावात नाय तर तालुक्यात गाजलेला कोणाच्या ही हातात न आलेला पैलवान. पण दादा नि त्या चुलत्याला सुद्धा चित करून ,असा डाव टाकला की ईचारु नका...!दादा पोरांना म्हणत व्हता शिकून कोणाच भल झालं हाय तव्हा ! माह्या कड बघा मी किती...

