पंढरी.!
पंढरीआलो पंढरीसी।विठूच्या गावाशी।चंद्रभागेपाशी।स्थिरावलो।।पुंडरिका भेटी।परब्रह्म आले।अठ्ठावीस झाले।युगे धरा।।वाळवंटी दिसे।वैष्णवांची दाटी।एकमेका भेटी।प्रेमभावे।।तीर्थांचे माहेर।विठूची पंढरी।आमुची वैखरी।विठू नामें।।सर्व भक्तांसाठी।सम आचरण।समदृष्टी जाण। विठोबाची।।भाव जैसा जैसा।तैसा पावे हरि।कृपा सर्वावरी।करीतसे।।-आबासाहेब कडूकार्तिक एकादशी(२-११-२०२५)सर्वांना कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा● हे वाचा –आमची लक्ष्मी.!पंढरी पंढरी - संत तुकाराम अभंग......
