नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह
नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रहव्यक्तीच्या अवतीभवती बऱ्याच बरेवाईट घटना घडत असतात. त्यातून त्याची जडणघडण होते. परिणामी एक विशिष्ट व्यक्तिमत्व घडत जाते. संवेदनशील व्यक्तीच्या मनावर अशा घटना परिणाम करतात. आलेले अनुभव अशा संवेदनशील व्यक्तीला शांत बसू देत नाही. परिणामी आपल्या अनुभवांचा उपयोग होऊन समाजाला दिशा मिळावी, पुढील पिढ्याना आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी धडपड सुरु होते. यातूनच लेखक संदीप राक्षे यांच्या ‘नि मि त्त मा त्र’ कथासंग्रहाचा जन्म झाला असावा. असे मला वाटते.बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला चाकूरकर, हास्यकवी संजय कावरे यांचे शुभहस्...
