Friday, November 14

Tag: नाही

तुला नाही जमणार हे गाणं.!
Article

तुला नाही जमणार हे गाणं.!

तुला नाही जमणार हे गाणं.!   तुला नाही जमणार हे गाणं. पंचवीस-तीस चाली झाल्या. आजच्या कोयना एक्सप्रेसने जा तू मुंबईला. मी बघतो या गाण्याचं काय करायचं ते." असा सणसणीत अपमान झेलून त्यांनी कोल्हापूरातला गाशा गुंडाळला आणि मुंबैला जायला निघाले...मनात प्रचंड कल्लोळ-घुसमट-कालवाकालव आणि गाण्याचे बोल... मुंबैला पोहोचेपर्यन्त एक लै भन्नाट चाल सुचली... आल्यापावली परत फिरला हा कलंदर ! परत कोल्हापूर गाठलं आनि दिग्दर्शक शांतारामबापूंना ती चाल ऐकवली...  "दे रे कान्हा S दे रे चोळी अन् लुगडी.." !!! शांतारामबापूंनी खूश होऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली ! तो महान संगीतकार होता 'राम कदम'. चित्रपट , अर्थातच 'पिंजरा' !   आज मी सिनेमा-नाट्यक्षेत्रात काम करतो. आजच्या पिढीतल्या एका सहकलाकारानं मला "किरण माने सर, हे 'राम कदम' कोण?" असं विचारलं होतं, तेव्हा खुप वाईट वाटलं होतं... त्यांच्या एकेका गाण्यात मायणीमधल्या माझ्य...
जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!
Article

जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!

जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!एका wp गृपवर काल मिसयुनीव्हर्सवरुन चर्चा सुरु होती ८० किलो वजनाची स्त्री स्पर्धेत उतरते त्यावरुन चाललेला चिवडा माझ्या वाचनात आला. आता सकाळी योगा करत असताना मी उठा बश्या काढत होते. जमीनीवर हात न टेकता मला उठबस करता येते म्हणजे मी फिट आहे. मी इंडीयन टॉयलेट मधे बसउठ करु शकते म्हणजे मी फिट आहे.मी खाली बसुन कपडे धुवु शकते किवा भांडी खाली बसुन घासु शकते,  फरश्या घासु शकते , माझे हात खाली वाकल्यावर पायाला लागतात किवा डोकं गुडघ्याना लागतं म्हणजेच मला पोट नाही आणि मी फ्लेक्झीबल आहे असही होवु शकतं. इंटरकोर्स करताना अनेक पोजेसचा मी सहज आनंद घेउ शकतो/शकते म्हणजे मी फिट आहे. कुठलही काम करताना माझं पोट मधे येत नाही आणि छोट्या कामाने थकायला होत नाही म्हणजे मी फिट आहे. यातलं कोणाकोणाला काय काय जमतं पहा कारण आपण सगळे मिसयुनीव्हर्स होणार नाहीत पण मिसहेल्दी, मिसॲक्टीव्ह, मिसॲट...
आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!
Article

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार, पण ती सुरूवातीची दोनेक वर्षे मला तिचं कमालीचं आकर्षण होतं. म्हणजे पहिल्यांदा तिला पाहिलं ना, तेव्हा मनात काय काय फिलिंग्स आल्या होत्या, हे सांगायला शब्द पण नाहीत. म्हणजे अगदी ती भेटायच्या अगोदर किती तरी वेळा तिचा माझ्या मोबाईल मध्ये असलेला फोटो मी पुन्हा पुन्हा बघायचो. भेट झाल्यावर तेव्हा आमचा सहवासही खूप होता.   तिच्याबरोबर कुठे आणि काय काय धमाल केली हे लिहायचं ठरवलं तर, एखादी दीर्घकथाच तयार होईल. ती सोबत असली की मला अगदी परिपूर्ण असल्याचं फिलिंग येत असे. कारण ती होतीच तशी.                   मला ती कायमच हवीहवीशी वाटायची. तिची सोबत खूप आनंद द्यायची. ती सोबत असली की, चारचौघांत रूबाबदारपणा यायचा. पण पुढे तिने स्वतःहून संबंध कमी केले. तिनं का असं केलं, समजलं नाही. माझ्यावर ती का नाराज झाली, कळले नाही. दर दिवसाआड होणारी आमची भेट महिना-दोन महिन्यात...