Friday, June 12

Tag: #तिफण #ग्रामीणजीवन #पेरणी #शेतकरीजीवन #पावसाळा #गावाकडच्याआठवणी #बैलजोडी #मराठीलेखन #ललितलेख #गौरवप्रकाशन #MaharashtraCulture #VillageLife #Farming #MarathiArticle

तिफण : पावसाळ्यातील ग्रामीण जीवन, पेरणी आणि बालपणीच्या आठवणी.!
Article

तिफण : पावसाळ्यातील ग्रामीण जीवन, पेरणी आणि बालपणीच्या आठवणी.!

तिफण : पावसाळ्यातील ग्रामीण जीवन, पेरणी आणि बालपणीच्या आठवणी.!माय पायटीच सयपाक खोलीत चुलीवर गंजात गरम पाण्याचं आंदन घेऊन न्याहरीच्या ज्वारी,उडीद भरड धान्य मिसवून चक्की वरून दवून आणलेल्या ज्वारीच्या पिठाच्या हातावर मस्त मिसयच्या भाकरी थापायची. ताव्यावर हिरव्या मिरच्या भाजून गडव्यानं त्या कुस्करून बारीक करायची म्हणजे ठेचायची. म्हणूनच कदाचित त्याचं नाव ठेचा पडलेलं असावं. त्या मंद पहाटेच्या प्रहरी चुलीतल्या त्या लाकडाच्या उजेडात आईचा चेहरा चमचम चमकायचा.आमचं घर म्हणजे समोर छोटीशी माडी धाब्याची खोली, त्याच्या मागं कौलारू सपरी म्हणजे ओसरी.ओसरीत एका कोपऱ्यात सातऱ्या,वाकया ठेवायची लाकडाची घडोसी. धान्याची,मातेऱ्याची पोतीच पोती.त्याच्याच समोर आठ बाय चारची कुडाची व शेणा-मातीचा गीलावा दिलेली सयपाकखोली.तीच्या भिंतीवर शेतातुन आणलेल्या तुऱ्याटया, पऱ्हाटयाईच्या छावन्या टाकलेल्या. ज्या पावस...