टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे..!
टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे !
टिटवीबद्दलची पोस्ट टाकल्यावर त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया एक अंधश्रद्धा आहे हे पण अनेकांना पटले पण पर्यावरणामध्ये प्रत्येक प्राणी कीटक याचे जैव-वैविधतेच्या दृष्टीने स्थान महत्त्वाचे आहे.त्यामुळेच इथला नियम आहे जगा आणि जगू द्या.टिटव्या फक्त रात्रीच ओरडत नाहीत. त्या दिवसाही ओरडतात! फरक फक्त एवढाच की, दिवसभर सुरू असलेल्या कोलाहलामुळे टिटव्यांचे ओरडणे आपल्या कानी पडत नाही. तरीही टिटव्या प्रामुख्याने रात्रीच्याच कालवा करतात आणि यामागे मोठे कारण आहे. अगदी मध्यरात्रीही टिटव्या टीव... टीव... टीटीव... टीव...! असा टाहो फोडतात. टिटव्यांचे ओरडणे मात्र कोणत्याच अंगाने अशुभ नसते. ती केवळ एक अंधश्रद्धा आहे.खेड्यात जुने घर अगदी शेताला लागून होते. आमचा वाडा संपला की खारी सुरू व्हायची.शिवाय अनेकदा रात्री शेतावर राहिलो असल्याने मी टिटव्यांचे ओरडणे अगदी जवळून अनुभवले आहे. हा पक्षी न...
