माणुसकीचा ओलावा कमी झाला.!
माणुसकीचा ओलावा कमी झाला.!बदल, आपण बरेचदा बोलुन जातो की अमका फार बदलला, तमका फार बदलला, अमका लग्नानंतर फार बदलला, माणसा माणसा मधे काळानुसार, त्या त्या वेळेनुसार बदल घडुन येतात, ऋतु बदलतात तशी काही माणसं पण बदलतात, त्यांचे स्वभाव बदलतात, गाव बदलतात, शहर बदलतात, जग बदलत चाललंय, मी बदललो असेन, तुम्ही बदलला असाल. काळानुसार लाईफ स्टाईल बदलत चाललीय. संडास ते शौचालय ते टॉयलेट ते वॉशरूम असा हा शब्दरूपी बदल अन् मोरी ते बाथरूम हा शब्दरूपी बदल नकळत घडून आला. पूर्वी मोरी वेगळी असायची अन् संडास वेगळे असायचे, आता दोघांना एकत्रित करून ते washroom झाले, केवढा हा बदल. हल्ली "संडास" शब्द उच्चारायला माणसं कचरतात, तो रांगडा शब्द वाटतो, त्या ऐवजी टॉयलेट / वॉशरूम हे सभ्य शब्द वाटतात म्हणुन त्यांची चलती जास्त आहे.शहरीकरण झाल्यानंतरचे एकंदरीत बदल आधुनिक सुख सोयी तर देतात पण एकंदरीत वाट पण लावून जातात असच म्हण...



