Wednesday, June 10

Tag: ग्रामीण संस्कृती

रायतं : कैरीच्या लोणच्यापासून शेतकऱ्यांच्या कष्टांपर्यंत… हरवलेल्या ग्रामीण जीवनाचा सुगंधी प्रवास.!
Article

रायतं : कैरीच्या लोणच्यापासून शेतकऱ्यांच्या कष्टांपर्यंत… हरवलेल्या ग्रामीण जीवनाचा सुगंधी प्रवास.!

रायतं : कैरीच्या लोणच्यापासून शेतकऱ्यांच्या कष्टांपर्यंत… हरवलेल्या ग्रामीण जीवनाचा सुगंधी प्रवास.!पहिलं वळवाचं पाणी पडलं म्हणजे शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीसाठी धावपय सुरू व्हायची. आई भल्या पहाटे चुलीवर दोन जाडजूड मिसयच्या भाकरी, व पापडाचा चुरा व कैरीच्या फोडी,एखादा कांदा फडक्यात शिदोरी बांधून द्यायची. आम्ही बैलगाडीत बसून सरळ शेतात यायचो. झाडाखाली बैलगाडी सोडून सावलीत न्याहरी करायचो.बाबा वखर जूतून पऱ्हाटया पाडायचे. तर आम्ही धसकटं पेटवायचो. भर उन्हात काम करतांना साजरी खातर निंघायची.अशातच पऱ्हाटयाईचा कवटा जमा करतांना एखाद्या काट्याईची फांजर बोटात धसायची. तो रक्तबंबाळ हात साऱ्या दिवसभर साजराच ठणकायचा.एवढा की भाकर खाणं मुश्किल होऊन जायची.शेतकऱ्याचं जीवन खुपच कष्ट व हालअपेष्टांनी भरलेलं.हे मी अगदी शेतकरी कुटुंबातील असल्यानं जवळून अनुभवलं. एका दिवसी तर कचऱ्याच्या गंजाखाली लपवुन ठेवले...