जत्रा.!
जत्रा.!कार्तिक महिना उजाडला म्हणजे गावाकडं चांगली कडाक्याची थंडी पडायची.सगळीकडे गारठा जाणवायचा. लोकांची गहू हरभरा रब्बीची पेरणी सुरू व्हायची.कापसाचं शितादही पूजन करून, सगळीकडे दहीभाताचं बोणं शिंपडून चांगल्या पीकाची आशा केली जायची. वेचणाऱ्या बाया सांगुन पहिला नवा वेचा काढल्या जायचा. शेतकऱ्यांच्या या पहिल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत केल्या जायचं. शेतात खाण्या लायक अंबाडीची भाजी, बारीक टमाटी, वायकं,शेंगा, भेंडी,गवारांच्या शेंगा,बरबटीच्या शेंगा खायला व भाजीला भरपूर उपलब्ध असायचं.आमचे आबा शेतात गेली म्हणजे धोतराच्या घोयात भरपूर काकड्या,वायकं,बोरं,चिंचा काहीना काही खायला हमखास आणायचे. सग्या, सोयऱ्यांनाही उडीद, भुईमूग, सुर्यफुलाचे बिया नवं म्हणून पायली भर सोबत बांधून द्यायचे. आदानप्रदान संस्कृती होती. पोरीच्या घरी बाप रिकाम्या हातानं कधी जायचा नाही.नवीन निघालेले काही ना काही सोबत लेकीकड...




