गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर…!
गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर...!धो धो पाऊस कोसळला कि आमच्या जांब नदीचा पूर पाहून डोळ्यांचं पारणं फिटायचं.खरं तर माझ्या गावची जांब नदी जेव्हा दुथडी भरून व्हायची तेव्हा तिचं रूप काही औरच असायचं.पुराचं पाणी खाली मऱ्हळकडे वाहत जायचं.पुराचं पाणी म्हणजे जणू चहाच्या किटल्याच नदीत आणून ओतल्या आहेत असं वाटायचं नि विस्तीर्ण अशी ती जलक्रीडा बघायला खूप आनंद मिळायचा.त्या आनंदाला पारावार राहायचा नाही.पूर बघयाला जाणं ही माझ्यासाठी नाही तर गावातल्या सर्वांनाच एक मोठी पर्वणी असायची.' पूर आलाय रे ….' अशी एकदा का आरोळी घुमली कि गावातले शौकीन अर्थात माझ्यासारखे ,सर्वच नदीचा पूर बघायला छत्र्या, घोंगड्या घेऊन जमायचे.किती पाणी आलंय, कोणत्या पट्ट्यात जादा पाऊस झालाय,आणखी हे पाणी खाली कुठपर्यंत जाणार याबद्दलचे अनेक अंदाज जमलेले लोक बांधत. तंबाखू मळता मळता लोकांच्या गप्पा पुराच्या पाण्याच्या आवाजात मिसळून जा...
