प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा ‘किनारे सरकत आहेत’ गझलसंग्रह |
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा "किनारे सरकत आहेत"गझलसंग्रहअनंत काळापासून दारिद्र्यात खितपत पडून जीवन कंठणारा आणि प्रस्थापितांकडून सातत्याने अंगावर येणाऱ्या मानसिक यातना,व्यथा, वेदना, अपमान पुर्वापार सहन करीत आलेल्या पुर्वाश्रमीच्या दलित, वंचित समाजाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसात आणून बसविले, त्यांच्यात स्वाभिमान पेरण्यासोबतच दिशाहीन असलेल्या वंचितांना सुयोग्य दिशा देऊन त्यांच्या अंधाऱ्या काळ्याकुट्ट जीवनात प्रकाश निर्माण केला आणि त्यातून त्यांचे जीवनमान हळूहळू सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करते झाले आणि मिळालेल्या संधीचे सोने करत वंचितांनी आपली वाटचाल केली व करीत आहेत.ज्याप्रमाणे निसर्ग नियमानुसार बदल हा अभिप्रेत असून त्याअनुषंगाने कोणतीही वस्तू मूळ स्वरूपात स्थावर राहत नाही.परंतु कालांतराने सततच्या उन,पाऊस, थंडी आणि वारा इत्यादींच्या भडीमाराने तीचे मूळ स्...
