ताशा, वेश्या आणि कविता
ताशा, वेश्या आणि कविता(सत्य कथा.)शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं.मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता.रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती.बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो.मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती.पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता.फटाक्यांचा माळा वाजत होत्या.ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता.तासभर धिंगाणा सुरूच होता.त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली.झोप लागत नव्हती.भूक लागली होती.उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला "क्या कालू झोपला नाहीस अजून". “अगं बच्चन अजून आला नाही”... असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली.ओठावर दोन ब...

