Monday, October 27

Tag: आई-वडील..!

आई-वडील..!
Article

आई-वडील..!

आई-वडील..!मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला...अगं... छान लापशी बनव,तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..! आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली,"बघुया मला दाखवा." इतक्यात,मुलगा पटकन बोलला ,"बाबा तिला कुठे Result दाखवताय?तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली.मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले,"हो रे...! ते पण खरच आहे."तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुदृढ व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती अशिक्षित होती ना...तुला सकाळी सात वाजता शाळेत जावं लागायचं म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची. अशिक्षित होती ना...तु रात्री अभ्यास करता क...