बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा
बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथाचांगलं आठवतंय. होय अगदी चांगलं आठवतयं. अन् आठवतंय म्हणून स्वत:ची लाजही वाटतीये. तेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यास करायचो, पण अभ्यासापेक्षा उनाडक्या जास्त करायचो. उनाडक्या करायला पैसा लागायचा. अन् पैसा कमवायची तर काही अक्कल नव्हती. म्हणून मग वडलांबरं खोटं बोलायचो अन् त्यांच्याकडून पैशे उकळायचो.बाप आमचा अडाणी. म्हणजे तसा शिकलेला. एसटीत कंडक्टर. पण, नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्यानं बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग, उसणंपासणं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर असलं काय काय करुन ते मला पैशे द्यायचे अन् मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो. फिरायला जायचो. पोरी फिरवायचो.एकदा तर एक पोरगी म्हणाली, ‘तुझे वडील काय काम करतात?’ तर ते कंडक्टर आहेत, हे मला सांगायला लाज वाटली. म्हणून मी ति...



