Tuesday, December 2

Tag: पारावरच्या

पारावरच्या गप्पा….!
Article

पारावरच्या गप्पा….!

पारावरच्या गप्पा....!खालच्या आळी चा दादा" देवळा समोर बसलेल्या पोरांना काय तरी सांगत व्हता. लांबून ऐकू येईना म्हणून , जवळ जाऊन ऐकाव म्हणून आप्पा "देवळा जवळ आला.आप्पा काही झालं तरी इरोधी पार्टीचा. त्यामुळं त्याला दादा नेमकं काय बोलतोय हे जाणून घ्यायला  आप्पाला मोकर उत्सुकता.आता दादा म्हंजी मोठी आसामी त्यात गावातल सरपंच पद राखीव असल्यामुळे  उपसरपंच पद दादा कड व्हत. पांढरी फॅक कापड . उंची बी चांगली शरीर पण धडधाकट , म्हणतात ना टक्कलम कवचितच दारिद्रम...अगदी तसच डोक्यार टक्कल , पण हुशार आणि लै अक्कल असल्या मुळे  दादा  गावगड्यात नेहमी पुढंअसणार .शिवाय दादा चा चुलता,म्हंजी नुसतं गावात नाय तर तालुक्यात गाजलेला  कोणाच्या ही हातात न आलेला पैलवान. पण दादा नि त्या चुलत्याला सुद्धा चित करून ,असा डाव टाकला की ईचारु नका...!दादा पोरांना म्हणत व्हता शिकून कोणाच भल झालं हाय तव्हा ! माह्या कड बघा मी किती...
पारावरच्या गप्पा….!
Article

पारावरच्या गप्पा….!

पारावरच्या गप्पा....!अय.....चेरमन आर कुड चालला ! तू तर मोकार बाता मारीत व्हता. आपला लै वट, खासदार ,मंत्री आन आमदार साह्यबा जवळ. ! मस  सारी दुन्या येऊन गेली की गावात कुड गेली मदत .ती पन तात्काळ की फात्काळ  येणार व्हती नव्ह . आता त ,थेट नागपुरात हाय हिवाळी अधिवेशनात  समद मंत्री संत्री, आन आमदार ! तिथं काय ठरलं का ? तुला फोन केला असलं की  तुह्या  ..साह्यबानि.. रामभाऊ थोडा हसला आणि म्हणाला अस पण तुमची इज्जत काय त्य माहीत हाय.जवळून जाणाऱ्या कुत्र्याला जोरदार हाड, आर हाड....! अस म्हणत त्याने विषय बदला आणि पुन्हा बोलू लागला. नाय तरी तिथं जाऊन तरी काय करत्यात म्हणा .सरकारी खर्च उगाच यर्थ अशी गत हाय भो नागपूर अधिवेशनात नाय का चेरमन!चेरमन हसला,आणि बोलू लागला. गारपीट झाली त्या येळी तुह्या थोबाडाव" गार  का नाय पडली भली मोठी. .? गप्प.. तरी राहिला असता. सारखी वलवाल लावली गावभर . इरोधी पार्टी नि खर्च...