Wednesday, November 5

Tag: दिवस..

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!
Article

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!     मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.तो आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.जणू पैलवानच.म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.आणि पोरं त्याच्या गुडघ्याला.अंगाने दणकट असणारा नाना.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.     त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता,वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची.त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची.पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं.आणि त्याचा परिणा...
एसटीतील प्रवासाचे दिवस..!
Article

एसटीतील प्रवासाचे दिवस..!

एसटीतील प्रवासाचे दिवस..!पूर्वी गावाकडे कच्चे रस्ते असायचे.1990 पर्यंत कडधे गावापर्यंत डांबरी रस्ता होता. यापुढे भोरगिरी पर्यंत कच्चा खडीचा रस्ता असायचा. त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच एसटी बस होत्या.लाल धुराळा उधळीत एसटी यायची.एसटीच्या पाठीमागे धुराचा डोंगर तयार व्हायचा. या धुराळ्यात मागचे काहीच दिसत नसायचे.एसटी आल्यावर आम्ही वाऱ्याची दिशा बघून एसटीचा धुरळा चुकवायचा प्रयत्न करायचो.त्याकाळी रस्ते झाले नव्हते.त्यामुळे ठराविक ठिकाणीच एसटीची सेवा उपलब्ध होती.तेही कच्चे रस्ते होते.अनेक लोक एसटी पकडण्यासाठी घरातून तासभर आधीच पायवाटेने, राना माळातून, डोंगर वाटेने पायी चालत एसटीच्या स्टॉप जवळ येत असत.कधी कधी आधीच एसटी निघून जाई.नाईलाजाने मग लोक पायी चालत. मी सुद्धा अनेक वेळी असा प्रवास केला आहे.त्यावेळी वाहतूकही तूरळक असायची.राजगुरूनगर - डेहणे ही एसटी सकाळी दहा वाजता डेहण्याल...
महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..
Article

महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..

महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके करून निघून गेली. पण जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊनगेली. आयुष्यभर संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची मांडणी करून गेली. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देऊनच आपल्या ऐहिक जीवनाची समाप्ती केली. गुरुवार, दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता एक पाय उशीवर, डोक्याजवळ हस्तलिखित कागद काही महत्त्वपूर्ण ग्रंथ,चष्मा एक इंजेक्शन सिरिज, एक औषधाची बाटली या अवस्थेत माईसाहेबांनी बाबासाहेबांना पाहिले.निद्रावस्थेत बाबांचे देहावसान झाले होते. हे कळल्यावर सात कोटी दलि...