चाळिसी…..!
चाळिसी.....! धड तरुणपण ही नाही आणि म्हातारपण देखिल नाही अश्या वयाचा टप्पा म्हणजे चाळीशी. खर तर म्हणतात महिलांना वय विचारू नये ! परंतु पुरुषांना तरी कुठे वय सांगायची इच्छा असते म्हणा ! जस फोटो काढताना वाढलेली ढेरी लपवण्याचा प्रयत्न पुरुष मंडळी करत असतात तसच वय लपवण्याचा ही प्रयत्न करत असतात बर का..! आहो तरुण दिसन कुणाला आवडत नाही सांगा! मी चौथीत असताना सलमान खानचा सिनेमा आला होता ,मैने प्यार किया! त्यात तो हिरो ,आता मी प्रेम करून अर्धा संसार देखील झाला, मोठी मुलगी BE करतेय तरी सलमान अजून ही हिरो....!म्हणजे बघा वय किती लपवतात नाही , वास्तवात त्याने आजोबा चे रोल करायला हवेत नाही का? जाऊ द्या भारतीय लोकांना हे असले थोराड" झालेलेच हिरो आवडतात त्याला आपण तरी काय करणार नाही का? पण खरं सांगू आपण म्हतारे झालो हे आपण कधी मान्यच करत नाही .उगाच आरशात समोर उभे राहून ओठावरील मिशी मध्ये प...
