अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्ड
अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्डअनाथांचा बाप होणे सोपे काम नाही.सामान्य मुलांना जेथे सांभाळणे कठीण काम तेथे बेवारस सापडलेल्या अनाथ,मूक बधीर ,दिव्यांग,गतिमंद मुलांना सांभाळण्याचे काम शंकरबाबा अविरत करीत आहे.बाबा कोणत्याही पुरस्काराचे भुकेले नसले तरी बाबांच्या वझ्झर मॉडेलची योग्य ती दखल भारत सरकारने घेऊन त्यांना सामाजिक क्षेत्रातला 'पद्मश्री' सन्मान घोषित केला त्यामुळे बाबांच्या चाहत्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे.तसाच तो मलाही झाला आहे म्हणून बाबांचे मनापासून अभिनंदन.वझ्झर येथील शंकरबाबांची व त्यांच्या मुलांची दिनचर्या बघितली तरी नकळत तोंडात बोट जाते.त्या दिनचर्येची आपण फक्त कल्पनाच करु शकतो.अगदी संगणकीय प्रणालीसारखे तेथे काम चालत असते.अर्थात त्याचे सर्वच श्रेय बाबांना जाते.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदावझ्झरच्या आश्रमातील बाबांच्या ह...
