अमरावती विभागास 6 कोटी 16 लक्ष 73 हजारांची तरतूद प्राप्त
गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) :
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा निधी प्राप्त व्हावा, यासाठी समाजकल्याण विभागास 60 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनामार्फत प्राप्त झाला आहे.
यामध्ये अमरावती विभागास एकूण 6 कोटी 16 लक्ष 73 हजार एवढी तरतूद प्राप्त झाली आहे. अमरावती विभागातील अमरावतीसह अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्याचे समाज कल्याण कार्यालयाला त्यांच्या मागणीनुसार रक्कम वितरित करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयाने स्वाधार योजनेसाठी मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज प्रथम निकाली काढावे.
स्वाधार योजनेचे अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच त्यांचा निधी जमा होणार आहे. स्वाधार योजनेच्या अटी व नियमांमध्ये बदल होऊन सुधारणा होण्यासाठी त्यात काही बदल होणार आहे. यामुळे आता स्वाधार योजनेच्या अंमलबजावधीमध्ये सुलभता निर्माण होऊन विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतीमान पध्दतीने मिळणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.