📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी

On: September 13, 2024 12:10 AM
आम्हाला फॉलो करा:

दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी

दोस्ती हा १९६४ सालचा भारतीय कृष्ण-धवल हिंदी चित्रपट असून सत्येन बोस दिग्दर्शित आहे आणि राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ताराचंद बडजात्या निर्मित आहे. ह्यात सुधीर कुमार सावंत आणि सुशील कुमार सोम्या मुख्य भूमिकेत होते आणि ही गोष्ट आहे दोन मुलांमधील मैत्रीची ज्यात एक अंध आणि दुसरा अपंग आहे. दोस्ती १९६४ सालच्या पहिल्या १० सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याला “सुपर हिट” म्हणून घोषित करण्यात आले. हा ४ थ्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झाला. १९७७ साली हा चित्रपट तेलुगू भाषेत स्नेहमच्या रूपात पुन्हा तयार करण्यात आला होता.

33a478e10185092c5a6388a882370ba4

दोस्ती ही रामू (सुशील कुमार) आणि मोहन (सुधीर कुमार) यांची कहाणी आहे. रामूचे वडिलांचा कारखान्यात काम करताना अपघातात मृत्यू होतो. जेव्हा कारखानदार नुकसान भरपाई देण्यास नकार देत, त्याच्या आईचा मानसिक धक्क्यामुळे मृत्यू होतो. एका अपघातात रामू जखमी होउन अपंग होतो आणि गरीब स्थीतीत मुंबईच्या रस्त्यावर उतरतो. येथे त्याला मोहन भेटतो, जो आंधळा आहे आणि अशीच दुर्दैवी कथा आहे. मोहन एका खेड्यातून आला आहे. त्याची बहीण, मीना नर्स म्हणून काम शोधण्यासाठी खेड्यातून मुंबईत स्थायिक झाली होती, जेणेकरून ती तिच्या भावाच्या उपचारासाठी पैसे कमावेल.

रामू हार्मोनिका वाजवण्यात चांगला आहे, तर मोहन एक चांगला गायक आहे. ते पथक तयार करतात आणि रस्त्याच्या कडेला गाणी गात पैसे मिळवतात. रामूला आपला अभ्यास पण संपवायचा आहे. ते दोघेही पुरेसे पैसे गोळा करतात जेणेकरून रामू शाळेत प्रवेश घेऊ शकेल. रामुचा गरीब असल्याने आणि भीक मागून पैसे मिळवल्याबद्दल त्याच्या शाळेत अनेकदा त्याची खिल्ली उडविली जाते. शाळेचे मुख्याध्यापक शर्माजी त्यांची मदत करतात आणि रामूने त्यांच्याबरोबर राहायला सुरुवात करावी आणि मोहनला सोडून द्यावे असा आग्रह धरतात.

5ff8a6d3e6a4f7120f983255fd922901

त्यानंतर लवकरच रामू काही गुंडांशी अडचणीत सापडतो आणि चुकून त्याला पोलीस अटक करता. शर्माजी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रामूला जामीनावर सोडवतात पण एका अटीवर की तो आता शर्माजींसोबत राहील आणि मोहनशी संपर्क साधणार नाहीत. मोहन हतबल होतो आणि दुःखी गाणी गात गल्लीबोळात फिरत असतो. शर्माजी अचानक मरण पावतात आणि फी भरणे शक्य नसल्याने रामू अंतिम परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतो. हे ऐकून, तब्येत बिघडली असतानाही, मोहन पुन्हा एकदा रस्त्यावर गाऊन पैसे उभा करण्याचा निर्णय घेतो. तो यशस्वीरित्या पैसे कमावतो आणि फी भरतो. जेव्हा रामू परीक्षेत प्रथम येतो आणि जेव्हा मोहनच्या त्यागाची माहिती मिळते तेव्हा तो मोहनला दवाखान्यात माफी मागण्यासाठी धावत जातो जिथे मोहन म्हणतो की आपण त्याच्यावर कधीही रागावलो नव्हतो. या सर्वांच्या प्रेमळ मिठीत चित्रपट संपतो.

(सौजन्य: विकिपीडिया)

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now