विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ
* नागरिकांनी लाभ घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
मुंबई, प्रतिनिधी : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेला 9 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.