
सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!
दसरा म्हणजे शहरात सोनं, दागिने, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि आनंदाचा सण. लोक खरेदी करतात, घर सजवतात आणि नवे कपडे घालतात. पण बडनेरच्या चावडी चौकात बसलेलं जनूना गावचं एक कुटुंब या चमकत्या आनंदापासून दूर, एका वेगळ्या संघर्षात दिसून आले. हे कुटुंब जंगलात तीन-चार दिवस राबून, काटेरी झुडपांतून आपट्याची पानं बाजारात आणतात. शहरातील लोक ती पानं सोन्याचे प्रतीक म्हणून घेतात, शुभेच्छांसाठी जपतात. पण जनूना गावातील कुटुंबासाठी ती पानं म्हणजे जीवनाचा आधार. ह्या मेहनतीतून त्यांना मिळतो थोडासा पैसा, घरसाठा, मुलांची शाळेची फी, औषधे आणि कपडे.
सोनं विकलं… हा शब्द ऐकताना शहरातल्या लोकांच्या डोळ्यासमोर संपत्ती, चमचमणारे दागिने, सुवर्णमयी वस्तू उभी राहतात. पण या कुटुंबासाठी हे “सोनं” नाही; हा फक्त पोटाच्या तोंडभराईसाठी, मुलांच्या शाळेसाठी, घराच्या गरजांसाठी आलेला आधार आहे. आई-वडील मनात विचार करतात, “हजार रुपये झाले… यामध्ये मुलांची फी भरावी की घरचे धान्य घ्यावं? औषधं घ्यावीत की कपडे?” हे सारे विचार त्यांच्या मनाच्या हिशेबात गुंफलेले असतात.
दसरा हा समृद्धीचा सण म्हणून ओळखला जातो. शहरात लोक सण साजरा करतात, पण ग्रामीण भागात हा सण आणि जीवनाची गरज एकत्र जुळवतात. शहरातील लोक ‘सणासाठी’ पानं घेतात, परंतु त्या पानांमध्ये ग्रामीण कुटुंबाचे कष्ट, त्याग, जिद्द आणि आशा दडलेली असते. शहरात पानं सोन्यासारखी चमकतात, पण त्यांच्या कष्टांनी त्यांना मिळालेली कमाईच खरी सोन्यासारखी असते.
हा फोटो आपल्याला एक सत्य दाखविते की, खरी संपत्ती फक्त पैसा किंवा सोनं नसते. ती मेहनत, सातत्य, कुटुंबासाठी केलेला त्याग, आयुष्यातल्या छोट्या-छोट्या निर्णयांतून मिळालेली समाधानी भावना असते. शहरातील वैभव आणि ग्रामीण संघर्ष यातील अंतर खूप खोल आहे, आणि हा फोटो त्या अंतराचा जिवंत आरसा आहे.
संपन्न शहर आणि संघर्षरत गाव यातील हा फरक आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो. शहरातले लोक सणाच्या रंगीबेरंगी खरेदीत रमलेले असतात, तर ग्रामीण कुटुंब आपल्या रोजच्या उपजीविकेसाठी मेहनत करत असते. त्यांचा दिवस उन्हात पानं गोळा करीत, झुडुपांतून उंच हातांनी वेचत, पोटासाठी थोडासा पैसा मिळवण्यासाठी जातो. हे कुटुंब दसऱ्याच्या सणाचा आनंद पाहत नाही, ते फक्त जीवनाचा हिशेब पाहते मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कसे जुळवायचे, घरातील धान्य कसे पुरवायचे, औषधे आणि कपडे कसे मिळवायचे.
फोटोतील त्या क्षणात, आई-वडील बसलेले, थकलेले, पण जिद्दीने भरलेले दिसतात. त्यांचे हात, त्यांची डोळ्यातली चिंता, त्यांच्या चेहऱ्यावरची थकवा, हे सर्व त्यांच्या मेहनतीची साक्ष देतात. शहरातील लोक ‘सोनं विकलं’ म्हणतात, पण त्या पानांतून आलेला पैसा म्हणजे त्यांच्यासाठी जीवनाचा आधार, स्वतःच्या घराचे पालनपोषण, मुलांचे भविष्य. हा संघर्ष फक्त आर्थिक नसून भावनिक आणि सामाजिकही आहे. ग्रामीण कुटुंबाला शहरातील लोकांच्या समृद्धीची कल्पना नाही; आणि शहरातल्या लोकांना ग्रामीण संघर्षाचा थेट अनुभव नाही. दसऱ्याच्या या सणात दोन जगांचा सामना आपल्याला दिसतो एक चमकदार, वैभवशाली शहर आणि एक संघर्षरत, मेहनत करणारे गाव.
सणाच्या आनंदाच्या चमकत्या दृश्यांमागे, ग्रामीण जीवनाच्या प्रत्यक्ष वास्तवाची जाणीव होते. ‘संपत्ती’ म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी असते.ग्रामीण जीवनात ती मेहनत, संघर्ष आणि जगण्यासाठी केलेला त्याग असतो. शहरातील लोक सणाच्या तयारीसाठी सोनं खरेदी करतात, पण त्यांच्या खरेदीतून मिळालेल्या पैशाचे मूल्य ग्रामीण कुटुंबासाठी जीवनाचा आधार असतो.
आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो मेहनत, संघर्ष आणि त्याग हेच खरे सोनं आहेत. शहरातील वैभव आणि ग्रामीण जीवन यातील अंतर आपल्याला आठवण करून देते की, प्रत्येक संपत्तीच्या मागे कुणाच्यातरी संघर्ष दडलेला असतो. दसरा सण, समृद्धी, आनंद हे फक्त खरेदीतून किंवा वैभवातून येत नाहीत; ते मेहनत, जिद्द आणि आयुष्याच्या संघर्षातून तयार होतात.
सोनं विकलं, पण त्या सोन्यातून खरी संपत्ती, खरी माणुसकी आणि जीवनाची खरी किंमत दिसते जनूना गावच्या कुटुंबाच्या मेहनतीत, त्यागात, जिद्दीत आणि त्यांच्यातल्या निस्वार्थ भावनेत. दसरा सण साजरा करताना आपल्याला लक्षात ठेवायला हवे की, प्रत्येक चमकत्या वस्तूच्या मागे कुणाच्यातरी कठोर मेहनत आणि संघर्ष दडलेला असतो. शहरी वैभव आणि ग्रामीण संघर्ष यातील हा अंतराचा आरसा आपल्याला जीवनाबद्दल, समजुतीबद्दल आणि सहानुभूतीबद्दल शिकवतो. हा फोटो, आपल्याला सांगते की खरे ‘सोनं’ आणि खरे ‘संपत्ती’ केवळ बाह्य दिसण्यात नाही; ती मेहनत, संघर्ष आणि जीवनाचा संघर्ष यामध्ये दडलेली आहे..!

बंडूकुमार धवणे, संपादक
गौरव प्रकाशन