- भीम शक्ती दाखवारे..!
- भीमाच्या लेकरांनो,आता तरी जागे व्हारे
- कुत्र्यापरी का जगता,भीमशक्ती दाखवारे!!धृ!!
- स्वातंत्र्य, समता, बंधुत्व दिले मुलतत्व
- कळेना भारतीय,नागरिकास महत्व
- अंतकरणी भीम तत्वाला आता रुजवारे !!१!!
- अन्याय अत्याचारी, जुलमी ती राजवट
- केला भिमाने, तिचा क्षणात नायनाट
- भिमाचे वीर रक्त अंगात साठवारे !!२!!
- लागूनी पाठी आहे जातीयवादी भूत
- बाबाच्या प्रतिमेचा,अपमान आहे होत
- जगावे सिंहापरी तो संदेश आठवारे !!३!!
- लिहिली भीमाने घटना जागुनी दिन-रात
- लावील कुणी का बोट,छाटून टाकु हात
- घटनेची रक्षा करण्या सारे समोर व्हारे !!४!!
- निद्रेत नका राहु काटेरी आहे वाट
- वैऱ्याना दाखवारे तुमची ती एकजूट
- नरेश भाऊ भावाचे वैर मिटवारे !!५!!
प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे
- मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
- मोबा.९९७०९९१४६४