* शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि.नाशिक यांचेवतीने दिले जाणारे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार जाहिर
नाशिक (प्रतिनिधी) : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ राज्यस्तरीय साहित्य कलाकृतीं स्मृती पुरस्कार जाहिर झाले आहेत. प्रतिष्ठानचे हे दुसरे वर्ष आहे.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल, येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ, यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांनी साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतीला साहित्य कलाकृती पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, गझलसंग्रह/ओवी/अभंग/ पोवाडा, या आणि अशा विविध साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी मागविल्या होत्या. महाराष्ट्रातून जवळपास ६५ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून प्रत्येक साहित्य प्रकारासाठी एका साहित्य कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे.
सदरचे पुरस्कार दि. ०४ जून २०२३ रोजी पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक येथे होणा-या कार्यक्रमात दिले जाणार आहेत. पुरस्कारप्राप्त निकाल पुढील प्रमाणे
कवितासंग्रह- कृष्णालिका – कवी मा. संतोष जगताप, लोहारा, वाघापूर रस्ता, यवतमाळ
कथासंग्रह – भयातुन निर्भयाकडे संवाद सेतू – लेखिका मा. डॉ सुनीता चव्हाण, गोराई, बोरीवली
गझल संग्रह – अविनाशपासष्टी- गझलकार मा. डॉ. अविनाश सांगोलेकर, बाणेर पुणे- ४११०४५
कादंबरी – बाभूळमाया – लेखक मा. विकास वसंतराव गुजर, कागल, जि. कोल्हापूर
वरीलप्रमाणे निकाल जाहिर झाले असून या साहित्य कलाकृतीचे परिक्षण अनुक्रमे कवितासंग्रह कलाकृतीसाठी प्रा. विजयकुमार लोंढे, पुणे, कथासंग्रह कलाकृतीचे परीक्षण प्रा. डॉ. निवेदिता राऊत, नागपूर, तर कादंबरी या कलाकृतीचे परिक्षण मा प्रा. सुवर्णाताई चव्हाण, येवला यांनी केले. तर गझल/ओवी/अभंग/पोवाडा, या साहित्य प्रकारच्या कलाकृतीचे परिक्षण साहित्यिक मा. प्रा. पंडित भारुड, कोपरगाव यांनी केले .
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पुरस्कार प्राप्त कलाकृतींच्या कवी/लेखकांना रोख रक्कम, सन्मानचिन्हं, मानाचे वस्र असे पुरस्कार दिले जाणार आहे. तसेच कलाकृतीचे प्रकाशक यांनाही सन्मानित केले जाणार आहे.
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे हे दुसरे वर्ष असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ, संपादक प्रशांत वाघ सचिव राजेश वाघ , मानद सचिव यमुना अशोक नारळकर यांनी वडीलांच्या स्मृती जागृत ठेवून स्तुत्य उपक्रम समाजात रूजवला आहे. प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिक्षकांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.