संवत्सर येथे नवनिर्वाचित संचालक पंडित भारुड यांची निवड
प्रशांत वाघ
कोपरगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत (इस्टेट) सोसायटी लिमिटेडच्या संचालक पदी संवत्सर ता. कोपरगाव जि अहमदनगर येथील पंडित जमनराव भारुड यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने संवत्सर ग्रामस्थांनी शाल श्रीफळ हार फेटा घालून सत्कार केला. त्यावेळी संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे मुकुंद मामा काळे, कोपरगाव तालुका मानवाधिकार कार्याध्यक्ष मोहनराव निकम, प्रगतशील शेतकरी राजुआबा बोरनारे, जयभीम पाणी वाटप सहकारी संस्थेचे संदिप मैंद, दिनेश नाना बोरनारे आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते. पंडित भारुड यांना त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देवून सर्वानी मनोगत व्यक्त केले. समस्त भारुड परिवार यांनी सर्वांचे आभार मानले.
कोपरगाव तालुक्याचे तरुण तडफदार नेते मा. विवेकदादा बिपिनदादा कोल्हे व प्रथम महिला आमदार मा स्नेहलताताई कोल्हे, मार्गदर्शक मा. बिपिनदादा कोल्हे तसेच संजीवनी एज्युकेशन सोसायटी चेअरमन मा. नितीन दादा कोल्हे व संपूर्ण कोल्हे परिवाराने औद्योगिक सहकारी वसाहतमध्ये दिलेली कामाची संधी संचालक पदी राहून जबाबदारीने पेलवू असे बोलून शेवटी सर्वांचे आभार मानले.
पंडित भारुड यांच्या निवडीचे संवत्सर ग्रामस्थ, तसेच शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, येवला कोपरगावचे गझलकार तथा अभिनेते मा राम गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.