अटल बिहारी वाजपेयी यांना विभागीय आयुक्तलयात अभिवादन
गौरव प्रकाशन अमरावती, : अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षल चौधरी, स्वीय सहायक अतुल लवणकर, सतीश कंठाळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थातांनीही स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.