
गौरव प्रकाशन अमरावती : विकसित भारत 2047 या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी विद्यार्थिनींसाठी मोफत रूबेला लसीकरण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथक आणि भावना कॅन्सर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या उपक्रमात महाविद्यालयातील 43 विद्यार्थिनींनी लसीकरण करून घेतले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या स्त्रीरोग व कॅन्सर तज्ञ डॉ. भावना सोनटक्के मॅडम यांनी विद्यार्थिनींना रूबेला लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच किशोरवयीन मुलींसाठी आहार, योग व व्यायाम यांचा निरोगी आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सीमा आढाऊ यांनी भूषविले. तर विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्या प्रा. डॉ. पूनम ताई चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी भावना कॅन्सर ट्रस्टचे सचिव कासट सर यांनीही शिबिरास भेट देऊन विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा तसरे (NSS कार्यक्रमाधिकारी) यांनी केले तर प्रा. अनुप आत्राम यांनी आभार प्रदर्शन केले.
महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. अजय कोल्हे यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांना मनःपूर्वक अभिनंदन करून अशा सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमांत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
या लसीकरण शिबिरामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता, निरोगी जीवनशैलीचे भान आणि रूबेलापासून बचावाची खात्री निर्माण झाल्याने हा उपक्रम विशेष ठरला.
——————————————–
——————————————–