रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न
स्वाती इंगळे :
पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे सात दिवशीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम मंगरूळ दस्तगीर या ठिकाणी विविध उपक्रमाने संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त श्री सुदामराव नागपुरे यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष मुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री सुधाकरराव बांते,सरपंच सतीश हजारे, मंगेश भबूतकर,संतोष नागपुरे,प्रा.विजय कामडी विचार पिठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन आणि सात दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे यांनी यावेळी विशद केली.शिबिरा दरम्यान स्वयंसेवक-स्वयंसेविका व गावकऱ्यांच्या श्रमदानातून शेततळे खोदण्यात आले तसेच हिंदू स्मशानभूमी आणि पोलीस वसाहतीची साफसफाई, ग्रामसफाई,पर्यावरण, साक्षरता जनजागृती,अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती,स्त्री-पुरुष समानता आदी विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम व पथनाट्य स्वयंसेवकांनी सादर केलीत. महिला मेळावा तसेच श्री संत शंकर महाराज श्री हरी भक्ती संगीत भजन मंडळ पिंपळखुटा श्री संत लहानुजी महाराज महिला भजन मंडळ मंगरूळ दस्तगीर यांच्या सुश्राव्य अशा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.सोबतच वनराई बंधारा आणि गावातील विविध मंदिराना भेटी सरपंच सतीश हजारे यांचेकडून माहिती करवून घेतली तसेच ठाणेदार सुलभा राऊत यांचे कडून पोलिस प्रक्रिया जाणून घेतली.
शिबिरा दरम्यान बौद्धिक सत्रात मान्यवराची व्याख्याने झाली त्यात चंद्रभागाबाई पाकोडे महाविद्यालय मंगरूळ दस्तगिरचे प्रा.सुरेश सांगळे,प्रा.सुषमा थोटे,आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वेचे प्रा.डॉ.अमोल बंड,प्रा. सुधाकर कांबळे,प्रफुल्ल डाफ,यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसाच्या प्रा.माधुरी धिवरे राऊत,सामाजिक कार्यकर्ते मंगेश मारोडकर,डॉ. मेघा सावरकर,आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वेचे प्रा.डॉ.श्रीकांत पाटील प्रा.विशाल मोकासे,प्रा.सुषमा कावळे,भारतीय महाविद्यालय मोर्शीचे प्रा.डॉ.संदीप राऊत, प्रा.घनश्याम दाणे,प्रा. विजय कामडी, सेफला ज्युनियर कॉलेजचे प्रा.नरेश कावलकर यांची व्याख्याने अनुक्रमे डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे विचार,संविधानाची उद्देश पत्रिका,सध्या स्थितीत होणारा लिंगभेद,राष्ट्रीय सेवा योजना–एक साधना,संत गाडगेबाबा यांची समाज प्रबोधन चळवळ या विषयावर व्याख्याने झालीत.शिबिरादरम्यान श्रमदानातून शेततळे आणि हिंदू स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली.
शिबिराचा समारोपिय कार्यक्रम स्थानिक महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री प्रशांतभाऊ शेलोकार यांचे अध्यक्षतेखाली तर संस्थेचे विश्वस्त सुदामराव नागपूरे,श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत पाटील,मंगरूळ दस्तगीरचे सरपंच सतीश हजारे श्री अशोकराव देशमुख, अनिलभाऊ देशमुख, प्राचार्य डॉ. सुभाष मुरे,प्राचार्य प्रमोद आंबटकर,मंगेश भबूतकर,श्री संतोष नागपुरे,पद्माकर नागपुरे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.शिबिराचे अहवाल वाचन गटप्रमुख कु.वैष्णवी बुराडे यांनी केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे तर उपस्थितीताचे आभार सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.श्यामला वैद्य यांनी मानलेत.शिबिर यशस्वीतेकरिता अमित मेश्राम, लक्ष्मण कांबळे,ओमप्रकाश इंगोले,ज्ञानेश्वर उके,मनोहर नागपुरे राष्ट्रीय सेवा योजना गटप्रमुख वैष्णवी बुराडे तसेच वैष्णवी गावंडे,आचल दिघोरे, गौरी ठाकरे,ऋतुजा ढगे,साहिल झिबड,करिष्मा शिवरकर,तेजस्वी मेश्राम, प्रणव हुडे,वैष्णवी गावंडे, ऐश्वर्या मराठे,साक्षी निस्ताने,पायल महात्मे,सोनाली शिवरकर,प्राची ठाकरे,हर्षल काळे,ऐश्वर्या शेंडे,प्राजक्ता शिदोडकर,कुलदीप मोहोड, पायल शिवरकर,आचल ढानके रेखा वडूरकर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालय विकास समिती पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,शिबिरार्थी,वस्तीगृह कर्मचारी,गावकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.