संविधान जनजानगृती काळाची गरज- प्रा. डॉ. खुशाल ढवळे
गौरव प्रकाशन यवतमाळ (प्रतिनिधी ) : 26 नोव्हेंबर 2023 संविधान दिनाला दुसर्या सत्रात “संविधान आज आणि उद्या” या विषयावर आयोजित बुद्धिस्ट बहुउद्देशीय समिती, बोदेगाव ता. दारव्हा येथील संपन्न कार्यक्रमात संविधान जनजानगृती काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. खुशाल ढवळे ह्यांनी केले. ‘खातो तो घास आणि घेतो तो श्वास भारतीय संविधानामुळे.’ भारतीय संविधान हे संविधान निर्माते प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळेच. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला बहाल केले. अर्थात. आम्ही भारतीयांनी अंगीकृत केले. व या देशाला आपला देश चालविण्यास मोठा दिलासा व आधार मिळाला. आज 74 वर्ष या देशाचा कार्यभार संविधानाने चालल्याने तळागाळातील, शोषित पीडित व मागास समाजाला प्रतिनिधित्व मिळायला लागले.
तळागाळातील जनतेला हक्क व अधिकार माहित झाले. आपलं जीवनमान उंचावून स्वाभिमानाने आपले जीवन जगणे हे काही मूठभर त्या काळातील वर्ण व्यवस्थेतील स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या काही लोकांना ते रुचत असल्याने ते मुठभर काही ठराविक लोक ज्यांना बहुजनाचा संविधानेमुळे झालेला उद्धार पहावल्या न गेल्याने, पाहवल्या जात नाही असे लोक संविधान बदलण्याची भाषा, संविधान विरोधी भाषा वापरत आहे. यामुळेच ही संविधान जागृती वा असे संविधान जनजागृतीचे कार्यक्रम घेणे काळाची गरज आहे असे प्रा. डॉ. खुशाल ढवळे हे बोलत होते.
संविधान मौलिक अधिकार समानता अधिकार अनुच्छेद 14 ते 18, स्वातंत्र्य अधिकार अनुच्छेद 19 ते 22, शोषणा विरुद्ध अधिकार अनुच्छेद 23 ते 24,धार्मिक स्वातंत्र्य अधिकार अनुच्छेद 25 ते 28, सांस्कृतिक तथा शिक्षा अधिकार, अनुच्छेद 29 ते 30 संविधानिक उपचार अधिकार अनुच्छेद 32, सांगण्यात आले.संविधान कालही होत आजही आहे आणि उद्यालाही पण राहणार असे कणखर शब्दात त्यांनी सांगितले.
कोणीही संविधानाच्या मुळ ढाच्याला हात लावू शकत नाही. मात्र संविधान मध्ये दुरुस्ती सत्ताधारी करत आहेत व करत राहतील. देशातील काही निर्णय उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकिकरण, या सारख्या निर्णयामुळे बहुजन व कष्टकरी समाजाचे जीवन जगणे कठीण झाले. भांडवलशाही कडे वाटचाल दिसते आहे. हे मात्र धोक्याचे आहे. हे उदाहरणे देऊन सांगितले तर खाजगी कारणामुळे संविधानाला हात न लावताही आरक्षण धोक्यात आणले जात आहे.
कामगार कायदे हे पूर्वी कामकारणारच्या बाजूचे होते ते आज व्यवसाय मालकाच्या बाजूचे केल्या जात असल्यामुळे उदयाला मात्र कष्टकरी बहुजन समाजाला तो घातक ठरत असल्याचे त्यानीं आपल्या मार्गदर्शनामध्ये श्रोत्यांना अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले. यासाठी आपल्या हाती येनारं 2024 हे महत्वाचे वर्ष आहे. आपल्या हिताचे कोण हे आपणास ठरविता येईल त्यांनाच आपण निवडावे. या शासनाने पूर्वी कर्मचाऱ्यांना सुरु असंनारी जुनी पेंशन देखील बंद करुन त्याचे म्हातारपण देखील अंधःकारमय कसे केले हेही त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आयु. वसंतराव पाटील हे होते तर सोबतच व्याख्याते म्हणून डॉ. सतीश दवणे कक्ष अधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर, मा. अविनाश भारती, मा. यशवंत राठोड यांनी देखील सविधान जनजागृती बाबत आपापले अमूल्य विचार व्यक्त केले. प्रमुख उपस्थित गणेश ढाकुलकर, आयु. सुलोचनाताई पाढेन सरपंच माणकोपरा, आयु. पांडुरंग मेश्राम, आयु. प्रा. सिद्धार्थ गायकवाड, आयु. शलिकराम गवई हे होते.
कार्यक्रमा चे सुरवातीलाच आयु. मा. पांडुरंग मेश्राम यांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्या बद्दल त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वतः प्रा. डॉ. खुशाल ढवळे यांनी त्यांचा टाळ्यांच्या गजरात सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन आयु. सीमा चक्रनारायण, सीताराम मोहड, यांनी केले तर प्रास्ताविक पांडुरंग मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र गजभिये यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता बुद्धिस्ट बहुउद्देशीय समिती बोदेगाव चे सर्व सभासदांनी सहभाग घेतला. या मध्ये आयु. मोहणभाऊ पाढेण माणकोपरा, आयु. रवींद्र गजभिये रामगाव रामे, आयु. नामदेव तायडे पिंपळगाव, आयु. चरणदास आठवले वरुड, आयु. शंकर धवणे करजगाव, आयु. पांडुरंग मेश्राम अध्यक्ष वंचित ब. आ. यवतमाळ जिल्हा , आयु. सदाशिव तायडे तरनोळी, आयु. शुक्लधन भगत सांगलवाडी , आयु. सोनाजी खंडारे बोदेगाव, आयु. मनोज पाटील , आयु. प्रकाश तायडे लोही इत्यादी मान्यवरानी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.