
नेमक चाललय काय
हेच हल्ली कळत नाही..
कुणीच कुणाला समजून घेताना
अजिबात दिसत नाहीं…
नात्याची वीण हल्ली
सैल होत चाललीय
माणुसकी तर गेली
नात्याची ओल देखील
पटकण सुखत चाललीय…
मनस्ताप होतो माणसाला यातून
बिचारा करणाऱ तरी काय…?
तो ही देतो स्वतःला
काळाच्या उदरात झोकून…
काळ तरी कुठे न्याय देतो
तो ही माणसाची जणू मजाच घेतो…
आज ना उद्या व्यवस्थित होईल
ह्या एकाच आशेवर तो हि आहे टिकून…..
……… तो हि आहे टिकून…

-अशोक किसन पवार
गटेवाडी ता.पारनेर अहिल्यानगर