📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

On: July 11, 2026 10:48 AM
आम्हाला फॉलो करा:
नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे.

प्राथमिक चौकशीत संबंधित विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आश्रमशाळेच्या परिसरात घडलेली नसून विद्यार्थिनी सुट्टीसाठी गावी गेली असताना हा प्रकार घडला होता. त्यामुळे आश्रमशाळेच्या प्रशासनावर थेट जबाबदारी येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिकचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान, या घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नियमित आरोग्य तपासणीदरम्यान ही बाब आधी का लक्षात आली नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!