सौ. माधुरी इंगोले अनंतात विलीन
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी): अंजनखेड वाशिम येथील प्रतिष्ठित नागरिक विष्णू इंगोले यांची पत्नी सौ. माधुरी इंगोले यांचे अल्पशा आजाराने 14 एप्रिल 2024 रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 35 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, मुली ममता, रिया, परी, दिव्या असा आप्त परिवार आहे.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने त्या सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.