आई, कर्ज भाकरीचे!

आई, कर्ज भाकरीचे!

बायको सतत आईवर आरोप करत होती..!!
आणि नवरा सतत तिला आपल्या
मर्यादेत राहन्यास सांगत होता..!!

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती.
ती जोरजोरात ओरडून सांगत होती,
“मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..!
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली आहे असा आरोप तिचा.

पण गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली तेव्हा
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..!
तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..
पत्नीला ती चापट सहन झाली नाही.
ती घर सोडून चालली
आणि जाता जाता पतीला तिनं एक प्रश्न विचारला
कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का..??

तेव्हा पति ने उत्तर दिले त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले तो क्षण..!!
पति ने पत्नी ला सांगितले..!

“जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले
आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं पोट भरायचं.
आई एका ताटात भाकर वाढायची
आणिरिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायची
आणि म्हणायची माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा..!!

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो
आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.
आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं.

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकीचा झालो खरा
पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,
आज ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेली असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..!!
तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.
मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.
हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

आई समजूच शकत नव्हती की
मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज….!!

ही माझीच पोस्ट आहे 2018 ची पण सहज आठवणी चाळताना समोर आली ती तुम्हां सर्वांसोबत #share करतो आहे..!
शेयर करायला कोणतीच शपथ नाही किंवा #शेअर केल्यावर चमत्कार होईल असे मी सांगणार नाही पण
आवडल असेल तर नक्कीच शेयर करा..!!

#goodmorningpost #goodvibes #tbt #todaysbestphoto #facebookpost #photooftheday #trendingnow #aai

बबलु जाधव पाटील

Avatar photo

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.