📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

मान्सूनचा ब्रेक वाढला! विदर्भात ४२°C उष्णतेचा तडाखा; शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला.!

On: June 21, 2026 5:58 PM
आम्हाला फॉलो करा:
• Agriculture News Maharashtra • Akola weather • Amravati Weather • Buldhana Weather • El Nino Effect India • farmer advisory Maharashtra • IMD Weather Alert • Maharashtra Monsoon 2026 • Maharashtra Weather Update • Monsoon Delay Maharashtra • Monsoon News Marathi • Rain Forecast June 2026 • Vidarbha Heatwave • Vidarbha Rain Forecast • Yavatmal Rain Update

राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना मान्सूनची प्रगती पुन्हा एकदा मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सध्या हरनई, सोलापूर आणि हैदराबाद परिसरातच थांबलेला असून त्या भागातही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र, २३ जूननंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता असून मान्सूनला पुन्हा गती मिळू शकते, असे संकेत मिळत आहेत.

विदर्भात उष्णतेची लाट कायम

२४ जूनपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. यवतमाळसह पूर्व विदर्भातील काही भागांत हलक्या सरींची शक्यता असली तरी उष्णतेची लाट कायम राहू शकते.

हवामान तज्ज्ञांच्या मते, २५ जूननंतर पावसाच्या हालचालींना चालना मिळण्याची शक्यता असून काही भागांत चांगल्या पावसाची सुरुवात होऊ शकते.

101

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पेरणी करू नये, असा महत्त्वाचा सल्ला प्रा. बंड यांनी दिला आहे. धुळपेरणी टाळण्याचे आवाहन करत त्यांनी फळबागांना आवश्यक तेवढेच हलके ओलीत सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच शेतातील काडीकचरा किंवा धुरे जाळण्याऐवजी तो जमिनीतच ठेवावा, त्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी नियोजन करावे. सरी-वरंबा पद्धतीने पेरणी करणे, तसेच सेंद्रिय खत व शेणखताचा वापर वाढवणे फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

एल निनोचा वाढता प्रभाव चिंताजनक

यंदा एल निनोचा प्रभाव मान्सूनवर स्पष्टपणे दिसून येत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे २०२६ हे वर्ष दुष्काळाच्या छायेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या एल निनोची सुरुवात झाली असून त्याची तीव्रता पुढील काही महिन्यांत वाढू शकते.

दरम्यान, २३ जूननंतर मेडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) अनुकूल होण्याची शक्यता असल्याने २५ जूनपासून पावसाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

सौजन्य : भारतीय हवामान विभाग (IMD) व हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!