
राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा
मुंबई, : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषत: मराठवाड्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 28 व 29 सप्टेंबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यास आज रेड अलर्ट देण्यात आला असून, पुणे शहरात सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात दहा हजार क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अहवाल
आज सकाळी 5.30 वाजता जारी केलेल्या राष्ट्रीय बुलेटिननुसार, पश्चिम विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत वेगाने पश्चिमेकडे सरकला असून, सध्या तो अकोल्यापासून 50 किमी दक्षिणेस, औरंगाबादपासून 180 किमी ईशान्येस, नाशिकपासून 330 किमी पूर्वेस आणि सुरतपासून 450 किमी पूर्व-आग्नेयेस केंद्रीत आहे.
पुढील 12 तासांत हा कमी दाबाचा पट्टा मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातून पश्चिमेकडे सरकून हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील दोन दिवस धोक्याचे
मराठवाडा आधीच पुराने त्रस्त असताना, आगामी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. नागरिकांना हवामान विभागाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
——————————————————
नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

——————————————————
——————————————————
राज्यभरात पुन्हा पावसाचं थैमान!