जनतेचं भरभरून प्रेम मिळविणारे जरांगे पाटील..!
राज्याच्या राजकारणात अनेक पाटील आले आणि गेले. परंतु इतकं अफाट प्रेम जनतेने ना! ह्यापूर्वी कुणा पाटलावर केलं , ना! करतील. कारण जरांगे पाटला सारखा निस्वार्थी” सर्वसामान्य पाटील आजवर मराठा समाजाला कधी मिळालाच नाही.
गरजवंत मराठा समाजा साठी लढला गेलेला हा लढा” आणि त्याचा सेनापती असणाऱ्या जरांगे पाटील यांची नोंद इतिहास तर घेईलच. परंतु राजकारणी ही बोध घेतील.आता समाजाला तुम्ही जातीच्या नावावर फसवू शकत नाही. सलाम ह्या लढ्याला. जो बंद दरवाजा आड चर्चा न करता माय बाप जनतेच्या समोर थेट चर्चा केली जाते. म्हणून ही, हा लढा आणि लढ्यातील चर्चेची पद्धती ही इथून पुढील कुठल्या ही सामाजिक लढ्यात एक नवीन पायंडा नक्कीच पाडून जाईल. ह्यात तीळ मात्र शंका नाही.
-अशोक पवार