संविधान संस्कृती रुजवणे काळाची गरज- उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे
गौरव धवणे
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : परदेशात भारताची प्रतिष्ठा ही भारतीय संविधानामुळे असून, अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृति देशात रुजणे व संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहोचणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी केले.
26 नोव्हेंबर 2023 संविधान दिवसाला भारतीय संविधान सन्मान दिन समारोह कार्यक्रम बुद्धिस्ट बहुउद्देशीय समिती, बोदेगाव ता. दारव्हा जि .यवतमाळ येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सुरवातीला त्रिशरण पंचशील, व बुद्ध वंदना घेण्यात आली. यानंतर वंदनीय भन्तेनी धम्मदेसना केली. यावेळी भदंत राहुल महाथेरो, भिकखूनी सुकेशनी, पूज्य भदंत धमवंश महाथेरो उपस्थित होते. कार्यक्रमाचे पहिले सत्रात उपविभागीय अधिकारी संजय खडसे, प्रा. अजाबराव खंडारे, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान शिल्पकार कसे ठरल ते सांगितले आयु.बाळासाहेब सोनोने, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष अजय गाडगे, इत्यादींनी भारताला 1947 ला स्वातंत्र मिळाल्या नंतर या देशाचा कार्यभार कसा राहील हे सांगितले.
या देशातील शासन प्रशासन कस राहील, या देशाचा संपूर्ण सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यावसायिक, कार्यभार कसा राहील हा प्रश्न देशासमोर होता. अश्या वेळी संविधान समिती आणि संविधान समिती व संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष पद डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांचे कडे ही जबाबदारी आली. या जबाबदारी ला कुठलाही तडा न जाता संपूर्ण कसोटी पणास लावून बाबासाहेबनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधीत देशाचे संविधान लिहले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला बहाल केले. अर्थात आम्ही भारतीयांनी अंगीकृत केले. व या देशाला आपला देश चाळविण्यास मोठा दिलासा व आधार मिळाला. आज 74 वर्ष या देशाचा कार्यभार संविधानाने चालल्याने तळागाळातील, शोषित पीडित व मागास समाजाला प्रतिनिधित्व मिळायला लागले. असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या सत्रात प्रमुख उपस्थित म्हणून आयु. बिमोद मुधाने, आयु. सुभाषभाऊ राठोड, आयु. डॉ. दयाल चव्हाण, माजी सभापती आयु. सुखदेव राठोड, बोदेगाव तंटा मुक्त समिती अध्यक्ष गोविंद जाधव गुरुजी इत्यादी मान्यवर हजर होते.
दुसरे सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर कक्ष अधिकारी सतीश दवणे, प्रा. डॉ. खुशाल ढवळे, यशवंत राठोड, अविनाश भारती या मान्यवराची भाषणे झालीत.मान्यवरांनी आपले भाषणात भारतीय संविधानाने तळागाळातील जनतेला हक्क व अधिकार माहित झाले. आपलं जीवनमान उंचावून स्वाभिमानाने आपले जीवन उंचावले हे काही मूठभर वर्ण व्यवस्थेतील स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या काही लोकांना ते रुचत नसल्याने ते मुठभर काही ठराविक लोक ज्यांना बहुजनाचा संविधानेमुळे झालेला उद्धार पहावल्या न गेल्याने,असे लोक संविधान बदलण्याची भाषा, संविधान विरोधी भाषा वापरत आहे. यामुळेच ही संविधान जागृती वा असे संविधान जनजागृतीचे कार्यक्रम घेणे काळाची गरज आहे असे प्रा. डॉ. खुशाल ढवळे हे बोलत होते.
संविधान मौलिक अधिकार समानता अधिकार अनुच्छेद 14 ते 18, स्वातंत्र्य अधिकार अनुच्छेद 19 ते 22, शोषणा विरुद्ध अधिकार अनुच्छेद 23 ते 24, धार्मिक स्वातंत्र्य अधिकार अनुच्छेद 25 ते 28, सांस्कृतिक तथा शिक्षा अधिकार अनुच्छेद 29 ते 30, संविधानिक उपचार अधिकार अनुच्छेद 32 सांगण्यात आले. संविधान कालही होत आजही आहे आणि उद्यालाही पण राहणार असे कणखर शब्दात त्यांनी सांगितले.
कोणीही संविधानाच्या मुळ ढाच्याला हात लावू शकत नाही. मात्र संविधान मध्ये दुरुस्ती सत्ताधारी करत आहेत व करत राहतील. देशातील काही निर्णय उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकिकरण, या सारख्या निर्णयामुळे बहुजन व कष्टकरी समाजाचे जीवन जगणे कठीण झाले. भांडवलशाही कडे वाटचाल दिसते आहे. हे मात्र धोक्याचे आहे. हे उदाहरणे देऊन सांगितले तर खाजगी कारणामुळे संविधानाला हात न लावताही आरक्षण धोक्यात आणले जात आहे.
कामगार कायदे हे पूर्वी कामकारणारच्या बाजूचे होते ते आज व्यवसाय मालकाच्या बाजूचे केल्या जात असल्यामुळे उदयाला मात्र कष्टकरी बहुजन समाजाला तो घातक ठरत असल्याचे त्यानीं आपल्या मार्गदर्शनामध्ये श्रोत्यांना अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले. यासाठी आपल्या हाती येनारं 2024 हे महत्वाचे वर्ष आहे. आपल्या हिताचे कोण हे आपणास ठरविता येईल त्यांनाच आपण निवडावे.या शासनाने पूर्वी कर्मचाऱ्यांना सुरु असंनारी जुनी पेंशन देखील बंद करुन त्याचे म्हातारपण देखील अंधःकारमय कसे केले हेही त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आयु. वसंतराव पाटील हे होते तर सोबतच व्याख्याते म्हणून मा. अविनाश भारती, डॉ. सतीश दवणे, प्रा. डॉ. खुशाल ढवळे, मा. यशवंत राठोड यांनी देखील सविधान जनजागृती बाबत आपापले अमूल्य विचार व्यक्त केले. प्रमुख उपस्थित गणेश ढाकुलकर, आयु. सुलोचनाताई पाढेन सरपंच माणकोपरा, आयु. पांडुरंग मेश्राम, आयु. प्रा. सिद्धार्थ गायकवाड, आयु. शलिकराम गवई सर हे होते.
कार्यक्रमा चे सुरवातीलाच आयु. मा. पांडुरंग मेश्राम यांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्या बद्दल त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वतः प्रा. डॉ. खुशाल ढवळे यांनी त्यांचा टाळ्यांच्या गजरात सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन आयु. सीमा चक्रनारायण, सीताराम मोहड, यांनी केले प्रास्ताविक पांडुरंग मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन रवींद्र गजभिये यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता बुद्धिस्ट बहुउद्देशीय समिती बोदेगावचे सर्व सभासदांनी सहभाग घेतला. या मध्ये आयु. मोहणभाऊ पाढेण माणकोपरा, आयु. रवींद्र गजभिये रामगाव रामे, आयु. नामदेव तायडे पिंपळगाव, आयु. चरणदास आठवले वरुड, आयु. शंकर धवणे करजगाव, आयु. पांडुरंग मेश्राम अध्यक्ष वंचित ब. आ. यवतमाळ जिल्हा, आयु. सदाशिव तायडे तरनोळी, आयु. शुक्लधन भगत सांगलवाडी, आयु. सोनाजी खंडारे बोदेगाव, आयु. मनोज पाटील, आयु. प्रकाश तायडे लोही इत्यादी मान्यवरानी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.