रासेयोचा उद्घाटन सोहळा संपन्न
पिंपळखुटा/स्वाती इंगळे : श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या सात दिवशीय निवासी शिबिराचा उद्घाटन सोहळा मंगरूळ दस्तगीर येथील श्री संत लहानुजी महाराज मंदिर येथे नुकताच संपन्न झाला.
उद्घाटन श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट पिंपळखुटाचे विश्वस्त श्री सुदामराव नागपुरे यांच्या शुभ हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष मुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री सुधाकरराव बांते, मंगरूळ दस्तगीरचे सरपंच सतीशराव हजारे,पंचायत समिती सदस्य माधुरीताई दुधे, प्रा.विजय कामडी श्री संतोषजी नागपुरे, मंगेश भाऊ भबुतकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला ओमप्रकाश इंगोले, नानासाहेब उके सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावकरी स्वयंसेवक स्वयंसेविका आश्रमचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश शं. इंगळे, सूत्रसंचालन सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. श्यामला वैद्य,आभार प्रदर्शन प्रा. सुषमा कावळे यांनी केले.
या सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिरात योगाभ्यास प्राणायाम, प्रभात फेरी, श्रमदान, बौद्धिक सत्र, गावकऱ्यांशी गटचर्चा, स्फूर्ती गीते व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या शिबिराच्या यशस्वीतेकरीता राष्ट्रीय सेवा योजना गटप्रमुख वैष्णवी बुराडे तसेच वैष्णवी गावंडे,आचल दिघोरे, गौरी ठाकरे ऋतुजा ढगे, साहिल झिबड, करिष्मा शिवरकर, तेजस्वी मेश्राम, प्रणव हुडे, ऐश्वर्या मराठे, साक्षी निस्ताने, निर्जला शिवरकर, पायल महात्मे,सोनाली शिवरकर, प्राची ठाकरे,हर्षल काळे,ऐश्वर्या शेंडे, प्राजक्ता शिदोळकर,कुलदीप मोहोड, पायल शिवरकर,आचल ढानके रेखा वडूरकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी प्रयत्न करीत आहे.