जनता मुर्दाड झाली आहे का?
सरकार बेकायेशीररीत्या स्थापन झालेल आहे अस सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतरसुद्धा सत्ताधारी लोकांवर कुठलीही कारवाई झाली नाही. लोकांनी यावेळेस मीम्स तयार केले. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पत्ता नाही. जनतेच्या प्रश्नांचे प्रतिनिधी नाही. जनता याचेसुद्धा मीम्स तयार करत आहेत.
पक्षात सत्तेसाठी गद्दारी करून लोकशाही मातीमध्ये मिळवल्या गेली. तेव्हाही जनतेने मीम्सच तयार केलेत. मतदान कुणाला केलं आणि सत्तेत कोण आल? यावरसुद्धा जनतेने मीम्सच तयार केले. तुम्ही मतदान केलेले प्रतिनिधी झाडे डोंगर हॉटेलामध्ये विकल्या गेले. तेव्हासुद्धा गाणी मीम्स तयार केल्या गेलloत.
कुणी धर्म वाचवायचा आहे म्हणून रस्त्यावर येत, तर कुणी साहेब, दादा, काका, पुतण्या, पक्ष , संघटना यांसाठी रस्त्यावर येत. मात्र मुलांच्या शाळा, शिक्षण, रोजगार, शेती अशा अनेक मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर कधीच येत नाही.
कुणाची हत्या झाली तर आरोपी आणि मृताच्या नावापुढे जात लावून जातीचे धर्माचे मोर्चे रस्त्यावर उतरतात. मात्र पोरांच्या भविष्याची हत्या इथले राजकारणी रोज करतात. त्यासाठी कुणीच रस्त्यावर उतरत नाही.
खर तर दारू, मटण, पैसा, किराणा, जात, धर्म, पंथ वा तडजोडी करून मत विकणाऱ्या लोकांना सरकारच्या नावाने बोंबलण्याचा काही एक अधिकार नाही. सरकार बेईमान होतच. मात्र त्याआधी आपण मतदानाच्या वेळी किती नैतिकता ठेवली ? यावर जनेतेने विचार करणे तेवढेच आवश्यक आहे.
कुणी देशाच्या राष्ट्रगीतावर आणि तिरंग्यावर बोलून जात, तर कुणी जगद्गुरू तुकाराम महाराज, छञपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, सवित्रीआई फुले या महापुरुषांवर बोलून जात. मात्र या लोकांवर कुठलीही कारवाई होत नाही. तेव्हापण जनता काहीच दिवस अवडंबर करते.
सत्ताधारी पक्षातील लोकांवर साधी टीका केली म्हणून अटक होते. मात्र महात्मा गांधीचा खून करणाऱ्या गोडसेंचे फोटो खुले आम फिरवणाऱ्या लोकांवर कुठलीच कारवाई होत नाही. आणि जनता तेव्हापण शांत असते. एकंदरीत इथल्या व्यवस्थेला माहिती आहे की, मुर्दाड झालेल्या जनतेची भूंकण्याची एक मर्यादा आहे. त्यापलीकडे ते जाऊ शकत नाही. म्हणून आजही आपली परिस्थती तीच आहे. अर्थात जनता मुर्दाड झाली आहे.
धन्यवाद.!
बेधुंदकार गोविंद पोलाड
मो. ८०८०१६६०११