गौरव प्रकाशन वृत्त संकलन
गुरुकुंज मोझरी : समाजातील शेवटच्या रुग्णापर्यंत पोहचण्यासाठी रुग्णालयांनी नेहमी लोकाभिमुख असले पाहिजे कारण रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा आहे.रुग्णसेवेचे महत्व ओळखून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९४४ मध्ये गुरुकुंजात आरोग्य विभाग सुरू केला त्याचा आज वटवृक्ष झालेला पाहून आनंद वाटला.असे प्रतिपादन राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पहाणी करतांना ते बोलत होते.
श्रीगुरुदेव रुग्णालयासारखी ग्रामीण भागात ४४हजार चौरस फुटाची भव्य इमारत क्वचितच इतरत्र पहायला मिळते ,गोरिबांना अत्यंत माफक दरात येथून सेवा मिळत असल्याने खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे.रुग्णालयातून अधिकाधिक सेवा रुग्णांना मिळून रुग्णालय व रुग्णसेवा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वधिकारी लक्ष्मण गमे,, सरचिटणीस जनार्दन बोथे,प्राचार्य मुरलीधर खारोडे यांनी मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी दामोदर पाटील,प्रचार प्रमुख प्रकाश वाघ,अध्यात्म विभाग प्रमुख डॉ राजाराम बोथे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, विजय पुनसे,भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी,राजेश वानखडे,आरोग्य विभाग प्रमुख डॉ पुरुषोत्तम पाळेकर व रुग्णालयीन कर्मचारी व इंटर्न विध्यार्थी उपस्थित होते.