* हिवरखेड येथील महाआरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिराला ११०० रूग्णांची तपासणी !
* ५५ रुग्ण शस्त्रक्रिये करीता नागपूरला रवाना !
* आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने शेकडो रुग्णांना मिळाला दिलासा !
गौरव प्रकाशन
मोर्शी (तालुका प्रतिनिधी): मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळाच्या वतीने ६ ऑक्टोंबर रोजी हिवरखेड येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमधील ११०० रूग्णांची तपासनी करण्यात आली असून ५५ रुग्णांना शस्त्रक्रिये करिता नागपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून मोर्शी तालुक्यातील हीवरखेड येथून महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळातर्फे नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मेडीसिन, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, न्युरोलॉजि, शल्यचिकित्सक, कान, नाक, घसा, मेंदू शस्त्रक्रिया (न्युरो सर्जन), किडनी रोग तज्ञ, हृदयरोग यासह आदी आजारांची भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व आजारांची तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमधील दापोरी, हिवरखेड, पाळा, डोंगर यावली, घोडदेव, बेलोना, उमरखेड, लाखारा, मायवाडी, भाइपुर, खानापूर, चिखल सावंगी येथील हजारो रुग्णांनी या भव्य आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आरोग्य तपासणी केल्यामुळे त्यांना मोफत औषोपचार करण्यात आला असून ५५ रुग्णांना शास्त्रक्रिये करीता नागपूर येथे पाठविण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नयेत. त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता भव्य आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया घेण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची मोफत तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणार्या रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया व पुढील उपचार नागपूर येथे करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, माजी शिक्षण सभापती श्रीपाद ढोमने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उमेश गुडधे, जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाळ, श्याम कुमार, त्र्यंबक उमाळे, विलास राऊत, हरीमोहन ढोमने, मोहन मडघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, घनश्याम बेलखडे, नंदकिशोर वाघमारे, गोपाल मालपे, संजय जवंजाळ, भूषण तिडके, योगेश धोटे, अक्षय ढोमने, सुशांत निमकर, अशोक राऊत, ओंकार महल्ले, दिलीप पवनकर, अनिल बंड यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.